भारतीय सैन्याचे पाकला चोख प्रत्युत्तर, पीओकेमधील दहशतवादी तळ केली उदध्वस्त

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आज भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे देखील उल्लंघन केले. पाकच्या या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय सैनिकांनी पाक व्याप्त काश्मिरमधील दहशतवादी कॅम्पला निशाणा बनवत आर्टिलरी गनचा वापर केला आहे.

पाक व्याप्त काश्मिरमधील नीलम खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या 4 लाँचिंग पॅडला भारतीय सैनिकांनी निशाणा बनवत नष्ट केले. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून, यात 4-5 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, तर अनेक जखमी झाले आहेत.

कुपवाडामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले होते तर एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले.

भारतीय सैन्याने पाक व्याप्त काश्मिरमधील जुरा, अथमुकम, कुंडलसाही येथील अनेक दहशतवादी लाँच पॅड उदध्वस्त केली.

 

Leave a Comment