या महाविद्यालयातील विद्यार्थांच्या डोक्यात शिक्षकांनी चक्क घातले खोके


नवी दिल्ली – तुझे डोके आहे की खोके अशा आशयाची म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण कर्नाटकातील एका महाविद्यालयात परीक्षे दरम्यान विद्यार्थांच्या डोक्यात शिक्षकांनी चक्क खोके घातले आहे. सध्या सोशल मीडियावर खोके घातलेला फोटो जोरदार व्हायरल होत आहे.

विद्यार्थ्यांनी कॉपी करु नये यासाठी कर्नाटक राज्यातील हवेरी भागातील भगत प्री-युनिव्हर्सिटी महाविद्यालयामध्ये ही अनोखी शक्कल लढवली आहे. विद्यार्थांच्या डोक्यात खोके घातले आहे. त्या खोक्यामुळे विद्यार्थांला फक्त स्व:ताचाच पेपर दिसेल अश्या प्रकारे ते कापण्यात आल्यामुळे पेपरमध्येच केवळ विद्यार्थीच बघू शकतील. ते खोके डोक्यात घातल्यामुळे आजूबाजूला मान देखील वळवू शकत नाहीत.

आजच्या गतिमान युगात अगदी शालेय पातळी वरील परीक्षापासून ते पदव्युत्तर परीक्षेपर्यंत कुठल्याही परीक्षेला “कॉपी”चा विळखा हा ठरलेलाच असतो. अनेक प्रयत्न ती थांबवण्यासाठी केले जातात. याआधी २०१३ मध्ये थायलंडमध्ये देखील कॉपी थांबवण्यासाठी पेपरपासून बनवलेले हेल्मेट घालण्यात आले होते.

Leave a Comment