आता बाजारपेठेत दाखल होणार ‘मोटोरोला’चा फोल्डेबल स्मार्टफोन


नवी दिल्ली : लवकरच आपल्या प्रसिद्ध ब्रँड रेजरला पुन्हा एकदा स्मार्टफोन कंपनी ‘मोटोरोला’ बाजारात लॉन्च करणार आहे. मोटोरोला रेजर फोल्डेबल हा स्मार्टफोन लवकरच कंपनीकडून लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन येत्या १३ नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार असल्याची शक्यता आहे. कंपनी लॉस एंजिलिसमध्ये मोटोरोला रेजर फोल्डेबलचे लॉन्चिंग करणार आहे.

याबाबत सीएनइटीच्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनमध्ये ६.२ इंची डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 710 प्रोसेसर, २७३० mAhची बॅटरी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यात ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ६ जीबी रॅम, १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसह हा फोन दोन वेरिएन्टमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा फोन पांढऱ्या, काळ्या आणि गोल्ड रंगात उपलब्ध होणार असल्याचे म्हटले जात आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन आणखी एका महागड्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या यादीत सामिल होणार आहे. स्मार्टफोनची किंमत १५०० अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास १, ०६, ६८२ एवढी असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment