‘नासा’च्या महिला अंतराळवीरांनी ‘स्पेस वॉक’ करत रचला इतिहास


फ्लोरिडा : एक ऐतिहासिक घडामोड सध्या या क्षणाला आपल्या डोक्यावर अवकाशात सुरू असून महिला अंतराळवीर नासाच्या पुढाकाराने स्पेस वॉक करताना दिसत आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची दुरुस्ती सुरू आहे. स्पेस वॉक करणाऱ्या सर्व महिला अंतराळवीर आहेत.


पुरुषांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आत्तापर्यंत झालेल्या ४२० स्पेस वॉकमध्ये सहभाग होता. परंतु, ४२१ वा स्पेस वॉक एक इतिहास आपल्या नावावर नोंदवणार आहे. महिलांचा एक चमू इतिहासात पहिल्यांदाच स्पेस वॉक करत आहे. नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर नवा इतिहास लिहित स्पेस वॉक करत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात उपस्थित सर्व चार पुरुष आतच राहतील. तर कोच आणि मीर तुटलेला बॅटरी चार्जर बदलण्यासाठी अंतराळ केंद्रातून बाहेर येऊन अंतराळात चालणार आहेत.

कोच आणि चालक दलाच्या एका पुरुष सदस्याने गेल्या आठवड्यात अंतराळ केंद्राच्या बाहेर नवी बॅटरी लावली तेव्हाच बॅटरी चार्जर बिघडला होता. ही समस्या सोडवण्यासाठी बॅटरी बदलण्याचे काम नासाने स्थगित केले आणि महिलांच्या नियोजित ‘स्पेस वॉक’वर लक्ष केंद्रीत केले.

Leave a Comment