देशातील ११ स्क्रीनवाले मल्टीप्लेक्स मुंबईत सुरु


गुरुवारी देशातील सर्वाधिक स्क्रीन असलेले आयनॉक्सचे मल्टीप्लेक्स मुंबईत सुरु झाले. या मल्टीप्लेक्समध्ये ११ स्क्रीन आहेत त्यामुळे त्याला मेगाप्लेक्स असे म्हटले जात आहे. या मेगाप्लेक्स मध्ये एकावेळी १५८६ प्रेक्षक मनोरंजनाचा आनंद लुटू शकतील आणि सहा विविध एक्स्परिमेंटल सिनेमाचा आस्वाद घेऊ शकतील असे आयनॉक्स ग्रुप कडून सांगितले गेले.

हे मेगाप्लेक्स अत्याधुनिक असून येथे सीटवर असलेले बटन दाबून प्रेक्षक त्यांच्या पसंतीचे फास्टफूड ऑर्डर करू शकणार आहेत. ६० हजार चौरस फुट जागेत या मेगाप्लेक्सचे बांधकाम केले गेले आहे. येथे स्क्रीन एक्स मल्टी प्रोजेक्शन तंत्राचा वापर केला गेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना २७० डिग्री पॅनोरॅमिक दृश्य पाहता येईल. म्हणजे समोरच्या स्क्रीन प्रमाणे डावी उजवीकडे स्क्रीन पाहता येईल. रोज येथे ६० शो होणार असून दिवसभरात ६ हजार प्रेक्षक चित्रपट पाहू शकतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment