मोटोरोलाच्या मोटो जी ८ प्लसचे फिचर्स लिक


येत्या २४ ऑक्टोबरला लाँच होणाऱ्या मोटोरोलाच्या मोटो जी ८ प्लसची स्पेसिफिकेशन्स लाँचिंग पूर्वीच लिक झाली आहेत. त्यानुसार या फोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, रिअर फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे. स्नॅपड्रॅगन ६५५ प्रोसेसर आणि ४ हजार एमपीएच ची बॅटरी त्याला दिली जाणार आहे.

या फोनला ६.३ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ६४ व १२८ जीबी मेमोरी, मेमोरी मायक्रोएसडी कार्डने वाढविण्याची सुविधा दिली गेली असून ४८ + १६ + ५ एमपीचा रिअर ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला आहे. त्यात एक प्रायमरी लेन्स असून दुसरा वाईड अँगल तर तिसरा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी २५ एमपीचा कॅमेरा आहे. ड्युअलसीम सपोर्ट दिला गेला असून अँड्राईड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

फोनला ड्युअल रिअर स्पीकर्स, युएसबी टाईप सी पोर्ट असून ब्ल्यू, रेड ग्रेडीयंट ग्लॉसी फिनिशिंग कलर्समध्ये तो मिळेल. अर्थात युजरला कलर ऑप्शन मिळू शकणार आहे.

Leave a Comment