‘बाला’मधील हे गाणे तुम्ही नक्कीच पाहा


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला कमी वयात टक्कल पडलेल्या माणसाचे आयुष्यात होणारे बदल आणि घडणा-या घटना थोड्या वेगळ्या आणि हटके अंदाजात मांडणारा ‘बाला’ हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर आता या चित्रपटातील धमाकेदार गाणे ‘डोन्ट बी शाय’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. बॉलिवूडचा सध्याच्या घडीतला सुप्रसिद्ध रॅपर बादशाहच्या आवाजातील हे गाणे खूपच व्हायरल होत आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, भूमि पेडणेकर आणि यामी गौतम प्रमुख भूमिकेत आहेत.

आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतमी हे तिघेही या रॅप साँगमध्ये बादशाह सोबत धमाल करताना दिसत आहे. बादशाहने 2010 साली आलेले ‘कंगना तेरा नी’ या गाण्याला त्याचा बादशाही टच देऊन एका वेगळ्या रुपात आपल्यासमोर आणले आहे. रंगभेदावरही या चित्रपटात भाष्य केलेले आहे. विषय जरी काहीसा अवघड वाटत असला, तरीही चित्रपटाची हाताळणी पूर्णपणे विनोदी आहे. अमर कौशिक याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच आयुष्मान, भूमी आणि यामी सोबत जावेद जाफ्री, सीमा पहावा, सौरभ शुक्ला ही मंडळी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.

Leave a Comment