विना हेल्मेट ट्रक चालविल्याप्रकरणी चालकाला पाठविले चलान


नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील वाहतूक पोलीस चलानच्या नावाखाली नागरिकांकडून अनोखे दंड वसूल करत आहेत. विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे हापूर येथील एका ट्रक चालकाला चलना पाठवल्याचा प्रकार घडला आहे.

हेल्मेट न घातल्यामुळे आणि ड्रायव्हिंग लायसन्स न बाळगल्यामुळे ग्रहमुक्तेश्वर येथील एका ट्रक चालकाला चलनाची नोटीस पाठवली गेली. या संबधीत मी माहिती मागवली. ही टायपोग्राफिक त्रुटीमुळे नोटीस चूकून गेल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आणि चलन रद्द केले जाईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

मोठ्या रकमेच्या पावत्या मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर देण्यात येत आहेत. यात काही अजब प्रकारही समोर आले आहेत. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशातील अलिगड येथे घडले होते. वाहतूक पोलिसांनी कारचालकास हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावला होता. गेल्या 31 जुलैला राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक पास झाले होते. १ सप्टेंबरपासून देशभरात लागू करण्यात आले आहे. यामध्ये ट्रफिक नियम तोडल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलानाची रक्कम 10 ट्क्क्यांनी वाढवण्यात आली आहे.

Leave a Comment