या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र येणार या भगिणी


बॉलिवूड कलाकारांनी वॉल्ट डिस्नेच्या ‘द लायन किंग’, ‘मॅलेफिसेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’, ‘जंगलबूक’ या सारख्या अनेक हॉलिवूड चित्रपटांना आवाज दिला आहे. आता वॉल्ट डिस्नेचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडच्या चोप्रा बहिणी, प्रियंका आणि परिणीती या चित्रपटाला आवाज देणार आहेत. या दोन्ही बहिणींचा हा पहिला एकत्र प्रोजेक्ट असणार आहे.


बच्चे कंपनीच्या मनावर वॉल्ट डिस्नेच्या ‘फ्रोझन’ या चित्रपटाने जादू केली होती. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘फ्रोझन २’ २२ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. हिंदीमध्ये देखील हा चित्रपट डब करण्यात येणार आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्रा हिंदीमध्ये डब करताना चित्रपटातील ‘एल्सा’ आणि ‘अॅना’ या दोन मुख्य भूमिकांना आवाज देणार असल्याचे समोर आले आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवर ‘फोझन २’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रियंकाने ही माहिती दिली आहे. प्रियंकाने हे पोस्टर शेअर करत ‘मिमि आणि तिशा आता एल्सा आणि अॅन होणार! पहिल्यांदाच चोप्रा बहिणी डिझ्नीच्या फ्रोझन २ चित्रपटात एकत्र येणार आहेत. आम्ही लवकरच तुमच्या भेटीला येऊ’ असे लिहिले आहे.

Leave a Comment