जाणून घ्या स्वातंत्र्यपूर्व काळातील खाजगी रेल्वेबद्दल

देशातील पहिली खाजगी रेल्वे तेजस एक्सप्रेसची सुरूवात झाली आहे. मात्र स्वातंत्र्यापुर्वी देखील भारतात अनेक खाजगी रेल्वे कंपन्या सुरू होत्या. त्यातील तिरहुत रेल्वे कंपनी दरभंगा राज्य चालवत होते. 1874 मध्ये दरभंगाचे महाराज लक्ष्मीश्वर सिंह यांनी या कंपनीची सुरूवात केली होती.

त्यावेळी उत्तर बिहारमध्ये दुष्काळ पडला होता. अशावेळी मदत करण्यासाठी कंपनीची पहिली रेल्वे 17 एप्रिल 1874 ला वाजितपूर (समस्तीपूर) ते दरभंगापर्यंत धावली. ही एक मालगाडी होती व याच्यातून धान्य पोहचवले जात होते. त्यानंतर याच मार्गावर प्रवासी रेल्वे सुरू करण्यात आली.

(Source)

उत्तर बिहार भागात तिरहुल रेल्वेचे जाळे पसरलेले होते. 1875 मध्ये दलसिंहसराय ते समस्तीपूर, 1877 मध्ये समस्तीपूर ते मुजफ्फरपूर, 1883 मध्ये मुजफ्फरपूर ते मोतिहारी, 1883 मध्येच मोतिहारी ते बेतिया, 1890 मध्ये दरभंगा ते सीतामढी, 1900 मध्ये हाजीपुर ते बछवाडा, 1905 मध्ये सकरी ते जयनगर, 1907 मध्ये नरकटियागंज ते बगहा, 1912 मध्ये समस्तीपुर ते खगड़िया इत्यादी ठिकाणी रेल्वेचे सेक्शन बनवण्यात आले होते.

(Source)

23 ऑक्टोंबर 1882 ला बंगाल ते नॉर्थ वेस्टर्न रेल्वेची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. यावेळी 1886 मध्ये अवधचे नवाब अकरम हुसैन आणि दरभंगाचे राजा लक्ष्मीश्वर सिंह हे दोघेही शाही परिषद सदस्य निवडले गेले.

(Source)

कायदा बनवण्याचा निर्णय –

राज परिवाराशी संबंध असणाऱ्या कुमुद सिंह सांगतात की, महाराज सिंह हे शेतकऱ्यांची जमीन रेल्वेसाठी अधिग्रहण केल्यामुळे ते नाराज होते. यासाठी त्यांनी शाही परिषद (राज्यसभा) मध्ये भूमी अधिग्रहणासाठी कायदा बनवण्याचा प्रस्ताव ठेवला.

(Source)

रेल्वे सुरू झाली त्यावेळी गंगा नदीवर पूल नव्हता. त्यामुळे प्रवाशांना नदीच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत पोहचवण्यासाठी स्टीमर सेवा सुरू करण्यात आली होती. तिरहुत स्टेट रेल्वेकडे 1881-82 मध्ये चार स्टीमर होते.

(Source)

तिरहुत रेल्वेचे प्रोपरायटर आणि दरभंगा महाराजांच्या सॅलूनमध्ये (रेल्वेतील रूम)) देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी प्रवास केला. यामध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्, मदन मोहन मालवीया या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. तिरहुत रेल्वे कंपनीकडे मोठी आणि छोट्या लाइनचे दोन सॅलून होते.

यामध्ये चार डब्ब होते. पहिला डब्बा दिवाणखाना आणि बेडरूम होते, दुसरा डब्बा स्टाफसाठी, तिसरा डब्बा पँट्री आणि चौथा डब्बा पाहुण्यासाठी होता.

(Source)

या सॅलूनमध्ये महाराजांसाठी बनलेल्या बेडरूमचे नाव नरगौना सूट होते. तर महाराणीसाठी बनलेल्या बेडरूमचे नाव रामबाग सूट होते. या सॅलूनच्या बाथरूममध्ये युरोपियन कमोड आणि बाथटब देखील होता. मोठ्या रेल्वेचे सॅलून हे बरौनी (बेगूसराय) येथे असे तर लहान लाईनचे सॅलून नरगौना टर्मिनल येथे असे. पाहुण्याच्या प्रवासावेळी हे सॅलून रेल्वेला जोडले जाई.

(Source)

तिरहुत रेल्वे अशी पहिली कंपनी होती जिने तिसऱ्या श्रेणीच्या डब्ब्यात शौचालय आणि पंख्याची सुविधा दिली होती. या रेल्वेमधून गांधीजींनी देखील प्रवास केला होता.

1950 मध्ये रेल्वेचे राष्ट्रीयकरण झाले. मात्र आज या रेल्वेचे एकही अवशेष सापडत नाहीत. मात्र कंपनीने बनवलेले रेल्वे मार्ग आजही वापरले जातात.

(Source)

तिरहुत रेल्वेने बनवलेली दरभंगा सहरसा लाइन देखील 1934 मधील भुकंपात नष्ट झाली. 1973 मध्ये बैरोनीमधील सॅलून (पॅलेस ऑन व्हिल) होते त्याला देखील आग लावण्यात आली. 1982 मध्ये नरगौना येथील सॅलून विकण्यात आले.

Leave a Comment