हातात वाईनचा ग्लास घेऊन मंदिरा बेदीचा करवा चौथ


काल देशभरात ‘करवा चौथ’ हा पवित्र सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी देखील करवा चौथ साजरा करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, बिपाशा बासू अशा अनेक अभिनेत्रींचा त्यामध्ये समावेश आहे. पण या सर्वांमध्ये मंदिरा बेदीने शेअर केलेल्या फोटोची सध्या चर्चा सुरु आहे. पती राज कौशलसोबत करवा चौथ साजरा करतानाचा फोटो मंदिराने शेअर केला. पण नेटकऱ्यांनी हा फोटो शेअर करताच मंदिरावर निशाणा साधला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंदिराने करवा चौथचा फोटो शेअर केला आहे. मंदिरा या फोटोमध्ये पती राज कौशलसोबत असून तिने सुंदर साडी नेसली असल्याचे दिसत आहे. दरम्यान वाईनचा ग्लास मंदिराच्या आणि तिच्या पतीच्या हातात असल्याचे दिसत आहे. तो वाईनचा ग्लास पाहून नेटकऱ्यांनी मंदिराला ट्रोल केले आहे. मंदिराला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. एका नेटकऱ्याने तर भारतीय संस्कृतीमधील सणांची खिल्ली तरी उडवू नये असे म्हटले आहे.

Leave a Comment