चिरंजीवीसोबत व्यंकय्या नायडूंनी पाहिला ‘सैरा’


काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांचा ‘सैरा-नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचीही या चित्रपटात भूमिका पाहायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला असून या चित्रपटाला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. अलिकडेच चिरंजीवी यांच्यासोबत हा चित्रपट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाहिला. तसेच, या चित्रपटातील सर्व कलाकारांचे त्यांनी कौतुकही केले.

त्यांनी चिरंजीवी यांच्या भूमिकेची प्रशंसा करत चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही प्रशंसा केली. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचेही कौतुक केले.


एक चांगला आणि प्रेरणादायी चित्रपट बऱ्याच दिवसांनंतर पाहिल्याचे वेंकय्या नायडू म्हणाले. ‘एन. टी. रामाराव’ आणि अक्कीनेनी नागेश्वर यांच्यानंतर चिरंजीवी हे सुपरस्टार असल्याचे ते म्हणाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनीही त्यांच्या पत्नीसोबत चिरंजीवी यांच्या घरी हजेरी लावली होती.’सैरा-नरसिम्हा रेड्डी’ हा हिंदीसह तेलुगू, तामिळ या भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे. आत्तापर्यंत २०० कोटीपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे.

Leave a Comment