आता एसबीआयच्या ग्राहकांना करता येणार कार्डविरहित व्यवहार

भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) दिवाळी आधी आपल्या ग्राहकांना एक गिफ्ट दिले आहे. बँकेने मोबाईलद्वारे पेमेंट करणारी सेवा ‘एसबीआय कार्ड पे’ सुरू केली आहे. या अंतर्गत बँकेचे ग्राहक प्वाइट ऑफ सेल्स (पीओएस) मशीनवर कार्ड आणि पिन न वापरता देखील पेमेंट करू शकतील. या सेवेबद्दल जाणून घेऊया.

एसबीआयने ग्राहकांना पिन व कार्ड न वापरता पीओएसवर पेमेंट करण्याची सुविधा दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच सेवा आहे.

असे करा पेमेंट –

एसबीआय कार्ड पे द्वारे फिल्ड कम्युनिकेशनवर टॅप करताच पेमेंट होईल.  यासाठी तुमच्याकडे कार्ड असण्याची गरज नाही. ही सेवा देखील एसबीआय कार्ड अॅपचाच एक भाग आहे. याद्वारे ग्राहक स्वतःचे क्रेडिट कार्ड अकाउंट देखील मॅनेज करू शकतात.

सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना करावे लागेल हे काम –

एसबीआय कार्ड पेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना एसबीआय मोबाईल अॅपवर कार्ड एकदा रजिस्टर करावे लागेल. यानंतर थेट फोन प्वाइंट ऑफ सेल मशीन जवळ घेऊन जाताच पेमेंट होईल.

या नवीन सेवेत ग्राहकांना आपल्या इच्छेनुसार प्रतिदिन देवाणे-घेवाणाची लिमिट निश्चित करण्याचा अधिकार आहे. इतर एचसीआय अॅपच्या ग्राहकांना 2 हजार रूपयांचे ट्रांजेक्शन आणि प्रतिदिन 10 हजार रूपये पेमेंट करण्याचे लिमिट आहे.

Leave a Comment