सूरज पांचोलीच्या ‘सॅटेलाईट शंकर’चा ट्रेलर रिलीज


बऱ्याच दिवसांनंतर पडद्यावर झळकण्यासाठी अभिनेता सूरज पांचोली हा सज्ज झाला आहे. तो ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सूरजने या चित्रपटाचे दोन पोस्टर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर केले होते. या चित्रपटाचा ट्रेलर आता रिलीज करण्यात आला आहे.

इरफान कमल यांनी ‘सॅटेलाईट शंकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकाची शौर्यगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यामध्ये सीमेवर देशद्रोहींसोबत लढत असतानाच सामाजिक कार्यासाठी झटणाऱ्या सैनिकाची कथा दाखवण्यात येणार आहे. तसेच, पडद्यावर सैनिकाच्या आयुष्यातील संकटही पाहायला मिळणार आहेत.

सूरजसोबत या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री मेघा आकाशनेही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बऱ्याचदा बदल करण्यात आला होता. अखेरी हा चित्रपट आता १५ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment