भज्जी आणि इरफान तमिळ सिनेमातून करताहेत डेब्यू


टीम इंडियाचा महत्वाचा हिस्सा असलेले दोन गोलंदाज हरभजनसिंग उर्फ भज्जी आणि वेगवान गोलंदाज इरफान पठाण त्याच्या करियरची नवी पारी सुरु करत आहेत. हे दोघेही तमिळ सिनेमात भूमिका करणार असून त्यानिमित्ताने सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. येथे त्याचे नशीब त्यांना कसे साथ देते याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हरभजनसिंग डिक्कीलुना नावाच्या तमिळ सिनेमात झळकणार असून यात अभिनता संथानम हाही लीड रोल मध्ये आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कार्तिक योगी करणार असून हरभजनने या संदर्भात ट्विटरवर पोस्ट केली आहे. तो म्हणतो, तमिळ सिनेमाशी माझी ओळख होते आहे या बद्दल सिनेमच्या टीमला धन्यवाद. सगळीच नाती शब्दात व्यक्त करता येत नाहीत.


इरफान काम करणार असलेल्या चित्रपटाचे नाव नक्की ठरलेले नसले तरी सध्या चियान विक्रम ५८ असे नाव या सिनेमाला दिले गेले आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अजय गननामुथू यांच्यावर सोपविली गेली असून संगीत ए. आर. रेहमान यांचे असेल. या चित्रपटाचे शुटींग देशात विविध भागात करण्यात येणार आहे. इरफानने या संदर्भात ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतो, नवे काम, नवे आव्हान. सध्या सर्व लक्ष यावरच केंद्रित केले आहे. हा अॅक्शनपट असल्याचे समजते.

Leave a Comment