गुगल मॅपला टक्कर देणार हे भारतीय अ‍ॅप

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) देशातील लोकांसाठी पहिले डिजिटल मॅप ‘नाविक’ तयार केले आहे. 2020 पासून क्वॉलकॉम प्रोसेसर असणाऱ्या स्मार्टफोनमध्ये या मॅपचा वापर करता येईल. हे मॅप अॅप बनवण्यासाठी इस्त्रो आणि क्वॉलकॉम टेक्नोलॉजीने भागिदारी केली आहे. याचबरोबर नाविक प्लॅटफॉर्मवर IRNSS टेक्निकचा देखील सपोर्ट मिळेल.

क्वॉलकॉमची लोकेशन बेस्ड टेक्नोलॉजी सध्या भारताच्या सात सेटेलाईट्सबरोबर सध्या काम करत आहे. यामुळे युजर्सला अचूक लोकेशनची माहिती मिळण्यास मदत होईल.

चिपसेटचा वापर –

इस्त्रो आणि क्वॉलकॉमने या नेविगेशन मॅपमध्ये चिपसेटचा वापर केला आहे. यामुळे ही सेवा काही मोजक्याच स्मार्टफोन आणि ऑटोमोटिव युजर्ससाठी उपलब्ध आहे. नाविक आणि स्टँडर्ड जीपीएस मिळून काम केले तर याचे नेविगेशन एकदम अचूक असेल.

नाविकबद्दल इस्त्रो चीफ के. सिवन यांनी सांगितले की, नाविकच्या मदतीने देशातील विकासाची गती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.  लोकांना यामुळे खूप फायदा होईल.

वर्ष 1999 च्या कारगिल युध्दानंतर भारताने नाविक नेविगेशन सिस्टम तयार करण्याचा विचार केला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानी सैन्याच्या लोकेशनची माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेची मदत मागितली होती. मात्र अमेरिकेने माहिती देण्यास नकार दिला होता.

जुलै 2013 पासून सॅटेलाईट सोडण्यास सुरूवात –

इस्त्रोने नाविकसाठी पहिले सॅटेलाईट आयआरएनएसएस-1ए चे 1 जुलै 2013 ला प्रक्षेपण केले होते. मागील एप्रिल महिन्यात आयआरएनएसएस सीरिदच्या सातव्या सॅटेलाईटचे सातवे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भविष्यात आणखी अचूक माहिती मिळवण्यासाठी सॅटेलाईट्सची संख्या वाढवून 11 करण्यात येऊ शकते.

Leave a Comment