हॉलीवूडचा हा कलाकार पुरस्कार सोहळ्यात का येतो बायकांच्या पोशाखात ?


हॉलिवूड सिनेसृष्टीतील बिली पोर्टर हा प्रसिद्ध अभिनेता असून क्रॉस ड्रेसिंग करण्याची बिली पोर्टरला आवड असल्यामुळे तो अनेकदा विविध पुरस्कार सोहळ्यात बायकांच्या पोशाखात दिसतो.


बिली पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परिधान केलेल्या या पोषाखामुळे चर्चेत आला. प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात बिली बायकांचे कपडे परिधान करुनच जातो. त्याच्या मते तो असे विचित्र प्रकारचे पोशाख ट्रेंडमध्ये राहण्यासाठी घालतो. बिली अभिनेता असण्यासोबतच एक उत्तम गायकही तो आहे.


आपण समलैंगिक असल्याचे त्याने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जाहीर केले. त्याने अॅडम स्मिथ नावाच्या व्यक्तिबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केले.

Leave a Comment