नवीन कार खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष

फेस्टिव सीझनच्या काळात गाड्यांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट्स देण्यात येत आहे. गाडी खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. ऑटो सेक्टरमध्ये मंदीचे वातावरण असल्याने कंपन्या कारवर भरघोस ऑफर्स देत आहेत. नवीन कार खरेदी करणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र कार खरेदी करताना डीलर तुमची मोठी फसवणूक करत असतात.

जुनी कार एक्सचेंज करताना घ्या काळजी –

जुनी कार एक्सचेंज करून नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे. कारण डीलर जुन्या कारची योग्य किंमत देत नाहीत. कारमध्ये अनेक अडचणी असल्याचे सांगत डीलर कारचे पैसे कमी करतात. अशावेळी त्यांच्या जाळ्यात न अडकता कारची योग्य किंमत घेणे गरजेचे असते.

विक्रीचे टार्गेट  –

प्रत्येक कार सेल्समन आणि डीलरकडे कार विक्रीचे टार्गेट सोपवण्यात आलेले असते. त्यामुळे कार खरेदी करताना महिन्याच्या शेवटी जा व शक्य तेवढी किंमत कमी करण्याचा प्रयत्न करा.

कार खरेदी करताना एखादे मॉडेल आवडले म्हणून कोणत्याही किंमतीत ती खरेदी करू नका. अशावेळेस सेल्समन तुमच्याकडून जास्त पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात. सेल्समनला फायनान्स आणि इंश्योरेंसचे कमीशन मिळत असते.

कारच्या एक्सेसरीज –

कार घेताना सेल्समन तुम्हाला कारच्या एक्सेसरीज बद्दल माहिती देईल. इंटीरियर कारपेट, सीट कव्हर्स, स्टीरियो सिस्टम, पार्किंग सेंसर अशा अनेक गोष्टी तो तुम्हाला सांगेल व तुमच्याकडून त्याचे अधिक पैसे देखील घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र तुम्ही ओपन मार्केटमधून कमी किंमतीत एक्ससरिज खरेदी करू शकता. एक्सेसरिज खरेदी करताना बिल नक्की घ्या. जर एखादा सेल्समन तुम्हाला 15 हजारांची एक्सेसरिज फ्री देत असेल तर एक्सेसरिजच्या जागी तेवढे डिस्काउंट मागा.

डिस्काउंटचे सत्य –

कार कंपन्या त्याच गाड्यांवर डिस्काउंट देते ज्या मॉडेल्सची विक्री कमी होत असते. जेणेकरून विक्री वाढेल. त्यामुळे चांगल्या डीलसाठी शोरूममध्ये उपलब्ध असलेल्या कारच खरेदी करा. जेणेकरून तुमची बचत देखील होईल.

Leave a Comment