९० चे दशक गाजवणारी ही टीव्ही अभिनेत्री झाली आता पॉर्न स्टार


अनेक अभिनेत्री फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटाने चमकतात. पण कधी कोणत्या दिशेने याच लोकप्रिय झालेल्या अभिनेत्रींची पाऊले वळतील हे काही सागू शकत नाही. एका हॉलिवूड अभिनेत्रीसोबत असेच काहीसे झाले आहे. या अभिनेत्रीने तर आपला मोर्चा चक्क पॉर्न इंडस्ट्रीकडे वळवला आहे. एका मुलाखतीमध्ये खुद्द या अभिनेत्रीने हा खुलासा केला आहे.

मॅटलेंड वार्ड ही ९० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘बॉय मीट्स वर्ल्ड’ या हॉलिवूड टीव्ही सीरिजमधील लोकप्रिय अभिनेत्री. आपल्या अभिनयाच्या जोरावर मॅटलेंडने ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. या अभिनेत्रीचे धक्कादायक सत्य नुकताच समोर आले आहे. अभिनय क्षेत्राबरोबरच आता पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास मॅटलेंड वार्डने सुरुवात केली असल्याचे म्हटले जात आहे. तिला रिशेल मॅक्गवायर या नावाने या इंडस्ट्रीमध्ये ओळखले जाते. या गोष्टीचा खुलासा खुद्द मॅटलेंडने केला आहे.

वयाच्या १६ व्या वर्षी, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बोल्ड अँड ब्यूटीफुल’ या मालिकेतून मॅटलेंडने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. तिने त्यानंतर ‘वार्डने यूएसए हाय’, ‘रूल्स ऑफ एन्गेजमेन्ट’ आणि ‘होम इम्प्रूवमेन्ट’च्या सातव्या पर्वामध्ये काम केले. मॅटलेंडला मालिकांनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किलिंग मिस्टर ग्रिफिन’ या चित्रपटात तिने काम केले. मॅटलेंडसोबत अभिनेता मारियो लोपेज मुख्य भूमिकेत होता. मॅटलेंडने त्यानंतर १९९८ मध्ये ‘बॉय मीट्स वर्ल्ड’ मध्ये काम केले. मॅटलेंड या शोमुळे खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. अनेकांच्या मनात तिने घर केले. तिने त्यानंतर २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका विनोदीपटामध्ये काम केले.

पॉर्न इंडस्ट्रीकडे वळण्याबाबत काही प्रश्न मॅटलेंडला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते. तिने त्यावर पहिल्या अडल्ट चित्रपटात काम करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. पहिले चित्रपटाची कथा मॅडलेंडने वाचली त्यानंतर चित्रपटातील भूमिकेसाठी होकार कळवला होता. तसेच चित्रपटातील मॅटलेंडची भूमिका ही सुंदर लिहिण्यात आली असल्याचे देखील तिने सांगितले.

Leave a Comment