एका एपिसोडसाठी कपिल शर्मा घेतो एवढे मानधन !


कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा’ हा शो छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. आपल्या विनोदाने अनेकांच्या मनात या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील कलाकार हे शोला अधिक रंजक बनवतात. पण सर्वांना खदखदून हसवणारा कपिल शर्मा या शोच्या एका भागासाठी किती मानधन घेत असले? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. कपिल शर्माचे एका एपिसोडचे मानधन नुकताच चित्रीत झालेल्या भागामध्ये समोर आले आहे.

बॉलिवूड गायक उदित नारायण यांनी नुकतीच द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. उदित नारायण यांच्यासोबत कपिल मस्ती करताना दिसत होता. दरम्यान मस्ती करत उदित नारायण यांच्या चेहऱ्यावर कपिलने कमेंट केली. जितका तुमचा गोड आवाज आहे, तितकाच निरागस चेहरा आहे. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असे वाटते की तुम्ही आज पर्यंत कधीच कोणाचे पैसे बुडवले नसतील आणि तुमचे पैसे खूप लोकांनी बुडवले असतील, असे पण मला वाटते, असे कपिल म्हणाला.

कपिलची प्रतिक्रिया ऐकून उदित नारायण यांनी लगेच प्रत्युत्तर दिले आहे. तर तुला स्ट्रगल करायची गरच नाही. मी असे ऐकले आहे की एका एपिसोडसाठी तु एक कोटी रुपये घेतो, कपिल शर्माची उदित नारायण यांचे हे मजेशीर उत्तर ऐकून बोलती बंद झाली. ते ऐकून सर्वत्र हास्याची लाट पसरली. पण एका एपिसोडसाठी कपिल शर्मा १ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment