देशातील पहिल्या नेत्रहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी सोमवारी तिरूवनंतपूरम येथे सब कलेक्टरपदाचा कार्यभार स्विकारला. महाराष्ट्राच्या उल्हासनगर येथे राहणाऱ्या प्रांजल यांनी 2016 मध्ये यूपीएससी परिक्षा पास केली आहे.
देशातील पहिल्या नेत्रहीन महिला आयएएसने स्विकारला कार्यभार
2016 च्या यूपीएससी परिक्षेत त्यांना 773 वी रँक मिळाली होती. पुढील वर्षी आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत प्रांजलने 123 वी रँक मिळवली होती. प्रांजल आपल्या ट्रेनिंग दरम्यान एर्नाकुलमच्या असिस्टेंट कलेक्टर होत्या.
30 वर्षी प्रांजल पाटीलने सांगितले की, त्यांना 6 व्या वर्षापासूनच दिसणे बंद झाले होते. त्यांनी सांगितले की, कधीच हार मानू नये कारण, आपण केलेले प्रयत्नच आपल्याला यश मिळून देतात.
