बापरे ! 8 वर्षांच्या मुलाने पकडला तब्बल 314 किलोंचा शार्क मासा

ऑस्ट्रेलियातील एका आठ वर्षीय मुलाने केलेल्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. ऑस्ट्रेलियातील जेडन मिलाऔरो नावाच्या 8 वर्षीय मुलाने तब्बल 314 किलोंचा शार्क मासा पकडला आहे.

जेडन आपल्या वडिलांबरोबर फिशिंग करण्यासाठी सिडनीतील साउथ कोस्ट येथे गेला होता. त्याचे वडिल सिडनी गेम फिशिंग क्लबचे सदस्य आहेत. त्यामुळे ते जेडनला देखील सोबत घेऊन गेले. जेडनच्या वडिलांनी सांगितले की, शार्क त्यांच्या बोटीच्या मागे-मागे येत होती. जेडनने शार्कला बघितले व त्याने हूक टाकले. तेथे अनेक फिशिंग एक्सपर्ट देखील उपस्थित होते.

Pending World Aust & NSW record 314kg to Port hacking smallfry Jayden congratulations to team undertaker

Posted by Sydney Game Fishing Club on Friday, October 4, 2019

त्याच्या वडिलांनी सांगितले की, तो दोन वर्षांचा असल्यापासून फिशिंग करत आहे. मात्र 314 किलोंचा शार्क पकडणे ही मोठी कामगिरी आहे.

शार्कला डेकवर आणण्यात आले. त्यावेळी शार्कचे वजन हे 314 किलो होते. एवढ्या किलो वजनाचा शार्क मासा पकडणे हा एक विक्रम आहे. कारण 1997 मध्ये इयान हिसेने 312 किलोंचा शार्क मासा पकडला होता.

 

Leave a Comment