24 कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आला फेटा, किंमत लाखो रूपये

राजपूतांची ओळख असणारा फेटा (साफा) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जयपूरमध्ये शुध्द सोने आणि चांदीच्या पातळ धाग्यांपासून फेटा तयार करण्यात आला आहे. असा फेटा 80 वर्षांपुर्वी एका राजपूताने घातला होता.

जयपूरच्या एका डिझाईनरने पुन्हा एकदा हा फेटा तयार केला आहे. भूपेंद्र सिंह शेखावत नावाच्या डिझाईनरला हा फेटा तयार करण्यासाठी 4 वर्ष लागली. सोन्यापासून बनवण्यात आलेल्या या फेट्याची किंमत तबब्ल 22 लाख रूपये आहे. याचे वजन 530 ग्रॅम आहे. या फेट्याची लांबी 9 मीटर आहे.

शेखावतने सांगितले की, अनेक दिवसांपासून मी सोन्याचा फेटा बनवण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनेटवर देखील मला अशा प्रकारचा एकही फेटा सापडला नाही. त्यामुळे हा फेटा बनवण्चा मी निर्णय घेतला. सोन्याचा फेटा बनवल्याने माझे स्वप्न पुर्ण झाले आहे.

80 च्या दशकात राजपूतांकडून हे सोन्याचे फेटे घातले जात असे. मात्र आता हे कोणीच बनवत नाही. 48 लोकांनी हा फेटा बनवण्यासाठी शेखावत यांची मदत केली. या फेट्याची माहिती मिळाल्यावर राजस्थानच्या एका उद्योगपतीने याची ऑर्डर देखील दिली आहे.

Leave a Comment