‘आर्ची’च्या भेटीला जान्हवी कपूर


मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या सैराट या चित्रपटाद्वारे ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरुने पाऊल ठेवले. 2016 मध्ये हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला. त्याचबरोबर अनेक विक्रम या चित्रपटाने आपल्या नावे केले. या चित्रपटामुळे नवोदित रिंकू राजगुरू तुफान लोकप्रिय झाली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कर देखील मिळाला.

View this post on Instagram

💕

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on


त्यानंतर या चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये हिंदी रिमेकही आला. ‘धडक’ या नावाने तो २०१८ मध्ये प्रदर्शित झाला. आपल्या पदार्पणासाठी दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवीने ‘धडक’ ची निवड केली. हा चित्रपट श्रीदेवी आणि जान्हवीने पाहिला होता. दोघींना चित्रपटाची कथा, त्यातील रिंकूची भूमिका भावली होती.

जान्हवीपुढे रिंकूने साकारलेली ‘आर्ची’ साकारण्याचे मोठे आव्हान होते. जी व्यतिरेखा रिंकूने साकारली ती आव्हानात्मक होती एवढ्या सुंदरपणे ती कोणीही साकारू शकत नसल्याचे कौतुकही जान्हवीने केले होते.

Leave a Comment