एवढ्या कोटींची मालकीन आहे ड्रामा क्वीन


नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत चर्चेत असते, मग ते तिच्या सेंसेशल सोशल मीडिया पोस्टमुळे असो किंवा तिच्या वादग्रस्त विधानांमुळे. पण ती सध्या मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत दिसत आहे, ती नेमकी किती संपत्तीची मालकीन आहे. इतक्यात कोणतीही जाहिरात अथवा सिनेमा राखीने केला नसून पण तरी देखील तुम्हाला तिच्याकडे असलेल्या संपत्तीचा एकूण आकडा नक्कीच थक्क करेल.

राखी तब्बल 15 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. मुंबई पोलिस विभागात राखीचे वडील आनंद सावंत हे कॉन्स्टेबल होते तर ती मुंबईत आई जयासोबत वास्तव्याला आहे. अनेक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 15 कोटींच्या संपत्तीची राखी मालकीन आहे. तिच्याजवळ मुंबईत दोन फ्लॅट आणि एक बंगला आहे. तिच्या बंगल्याची एकुण किंमत 11 कोटी रुपये आहे. याशिवाय तिच्याजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार आहे. ही सर्व कमाई तिला स्टेज परफॉर्मेसमधून येते.

Leave a Comment