चंद्रावर सापडला ताज्या पाण्यापासून बनलेल्या बर्फाचा साठा

चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागामध्ये असलेल्या बर्फाच्या साठ्याबाबत लावण्यात आलेल्या अंदाजाबाबत आता नवीन खुलासा झाला आहे. आधी लावण्यात आलेल्या अंदाजापेक्षा हे साठे नव्याने तयार झालेले आहेत. या आधी वैज्ञानिकांनी हे साठे कोट्यावधी वर्ष जुने असल्याचा दावा केला होता. मात्र आता हे साठे नव्याने तयार झाल्याचा दावा अमेरिकेच्या ब्राउन युनिवर्सिटीच्या संशोधकांनी नासाच्या रिकॉनिस्सेंस ऑर्बिटरच्या डाटाचा अभ्यास करून केला आहे.

हे ऑर्बिटर 2009 पासून चंद्राची परिक्रमा करत आहे. वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या क्रेटरचा अभ्यास करून त्याचे बनण्याटे वय शोधण्याचा दावा केला आहे. इकारस नावाच्या जर्नलमध्ये हा शोध प्रकाशित झाला असून, यामध्ये म्हटले आहे की मोठ्या क्रेटर्सच्या खाली छोटे क्रेटर्सची संख्या मोजून वैज्ञानिकांनी याच्या बनण्याचा कालावधी शोधला आहे.

या आधी वैज्ञानिकांनी अंदाज व्यक्त केला होता की, क्रेटर्सचे निर्माण हे लघुग्रह आणि धुमकेतूंमुळे झाले आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, 31 कोटी वर्षांपुर्वी बनलेल्या क्रेटर्समध्ये बर्फाचा साठा आहे. मात्र जे छोटे क्रेटर्स आहेत त्यातील पाणी हे ताजे आहे.

भारताने देखील चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरची लँडिग चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेरच्या क्षणी लँडरशी संपर्क तुटला होता.

Leave a Comment