सोशल मीडियात ट्रेंड होत आहे #मोदी_परत_जा हॅशटॅग


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा रविवारी जळगावमध्ये पार पडली. मोदींनी यावेळी आपल्या भाषणाला मराठीमधून सुरुवात केली. पण अनेकांनी मोदींच्या या पहिल्याच सभेला विरोध केल्याचे इंटरनेटवर पहायला मिळाले. रविवारी रात्री मोदी भाषण संपवून परत गेल्यानंतरही ट्विटरवर #मोदी_परत_जा हा हॅशटॅग इंडियावर टॉप ट्रेण्डींग होता. मोदी महाराष्ट्रात पूर आला असताना आले नाही आणि आता मते मागायला आले आहेत, तसेच पंतप्रधान शेतकरी आत्महत्या झाल्यावर महाराष्ट्र दौरा करत नाहीत केवळ मते मागायला येतात अशा अशयाचे अनेक ट्विटस हा हॅशटॅग वापरुन करण्यात आले होते. याबाबत ‘राईट टॅग डॉट कॉम’ या वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार एक लाखाहून अधिक ट्विटस या हॅशटॅग वापरुन एका दिवसात करण्यात आले. एकूण चार हजारहून अधिक जणांनाही हा हॅशटॅग आपल्या ट्विटमध्ये वापरल्याचे या वेबसाईटवरील डेटा सांगतो.

#मोदी_परत_जा या हॅशटॅग संदर्भातील माहिती ‘राईट टॅग डॉट कॉम’ या हॅशटॅग ट्रॅकिंग वेबसाईटच्या माध्यमातून काढण्यात आली. त्यावेळी हा हॅशटॅग वापरून १० हजार ४५३ हून अधिक ट्विट करण्यात आल्याचे दिसते. तर हा हॅशटॅग चार हजार ४ हजार १९४ जणांनी वापरल्याचेही हा डेटा सांगतो. तसेच अॅण्ड्रॉइडबरोबरच आयफोन वापरणाऱ्यांनाही हा हॅशटॅग वापरुन ट्विट केल्याचे या डेटामध्ये नमूद करण्यात आले आहेत. #मोदी_परत_जा हा हॅशटॅग दर तासाला वापरून ७५० ट्विटस नेटकऱ्यांनी केले. या ट्विटला एका तासामध्ये ६० हजार ४०० लोकांनी पाहिले. तर तासाभरात २ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केले.

Leave a Comment