अनेक वादांनंतर रिलीज झाला नवाजुद्दीन-अथियाच्या ‘मोतीचूर चकनाचूर’चा ट्रेलर


आगामी ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक नवाजुद्दीन सिद्दीकीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नवाजुद्दीनसोबत अथिया पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहे. दोघांचीही हटके केमेस्ट्री या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. विदेशात अथिया शेट्टीला जायचे असते. ती याच कारणासाठी नवाजुद्दीनसोबत लग्न करते. पण तिला लग्नानंतर कळते, की त्याला लग्नानंतरच नोकरी लागली आहे. तिला ही गोष्ट समजल्यानतंर काय काय प्रसंग घडतात त्याची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

Leave a Comment