भयावह घोस्टचा नवा ट्रेलर तुम्ही पाहिला आहे का ?


थरारक भयपटांसाठी दिग्दर्शक विक्रम भट्ट हे ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ‘हाँटेड’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केल्यानंतर विक्रम भट्ट यांचा आगामी ‘घोस्ट’ हो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचा आता पुन्हा नवा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.


चित्रपटाच्या ट्रेलर पाहूनच अंगावर काटे ऊभे राहतात. हा चित्रपट २०११ सालीच तयार करण्याची सुरुवात झाली होती. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील सनाया ईरानी ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, शिवम भार्गव हा अभिनेताही यामध्ये झळकणार आहे. या चित्रपटात विक्रम भट्ट स्वत:ही महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

विक्रम भट्ट यांची अंत्यत वेगळी वाट चोखाळणारे दिग्दर्शक अशी ओळख आहे. त्यांनी आजवर ३० हून अधिक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी असंख्य चित्रपटांचे लेखन केले आहे. त्यांच्या नावावर सुमारे २५ वेब सिरीज आहेत. हा चित्रपट १८ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment