फॅन्सी नंबरप्लेट आढळल्यास रद्द करू शकते ड्रायव्हिंग लायसन्स


मुंबई – आता फॅन्सी पद्धतीने कार किंवा मोटारसायकलचा नंबर लिहणे मायानगरी मुंबईमध्ये महागात पडण्याची शक्यता आहे. मुंबईत सार्‍या आरटीओंना नुकतीच फॅन्सी नंबरप्लेट धारकांना समज दिल्यानंतरही बदल न झाल्यास त्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुमारे 2000 वाहनचालकांना जानेवारी ते ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत ई चलन पाठवण्यात आले आहे. देवनागरीमध्ये किंवा काहीशा फॅन्सी अंदाजामध्ये या चालकांचे नंबर प्लेट्स आहेत.

सुमारे 1000 रुपयांचा दंड फॅन्सी नंबरप्लेट वापरल्यास वाहनधारकाकडून आकारण्यात येतो. राजकीय मंडळी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा यामध्ये अधिक समावेश आहे. सुमारे 9000 दुचाकीस्वारांचे परवाने 2018 मध्ये रद्द करण्याच आल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते त्रिवणकुमार कर्नानी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली आहे.

नंबरप्लेट्सच्या बाबतीमध्ये सार्‍या राज्यात एकाच प्रकारचा नियम असावा असे मत एका वाहतूक पोलिसाने व्यक्त केले आहे. अनेकदा इतर भाषिक नंबरप्लेट वाचायला वेळ लागतो किंवा ती चटकन समजणे शक्य नसते. गुन्ह्यात ती गाडी सहभागी असेल तर त्यावर कारवाई करताना अडचण येऊ शकते. त्यामुळे इंग्रजी भाषेतच देशभर नंबरप्लेट असावी.

Leave a Comment