सलग 12 वेळा मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रींमत व्यक्ती

फॉर्ब्स इंडिया मॅग्झिनने भारतातील सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींची यादी जाहीर केली असून, सलग 12 व्यांदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रींमत व्यक्त आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 51.4 बिलियन डॉलर म्हणजेच 5,140 कोटी डॉलर एवढी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 40 लाख डॉलरनी अंबानी यांच्या संपत्ती वाढ झाली आहे.

या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी गौतम अडाणी असून, त्यांची संपत्ती 1570 कोटी डॉलर एवढी आहे. गौतम अडाणी यांनी मोठी झेप घेतली आहे. मागील वर्षी अडाणी हे 10 व्या स्थानी होते. तर 1560 कोटी डॉलर सहित हिन्दुजा ब्रदर्स या यादीत तिसऱ्या स्थानी आहेत.

भारतातील सर्वात श्रीमत 10 व्यक्ती –

मुकेश अंबानी : 5140 कोटी डॉलर

गौतम अडानी : 1570 कोटी डॉलर

हिंदुजा ब्रदर्स : 1560 कोटी डॉलर

पी मिस्त्री : 1500 कोटी डॉलर

उदय कोटक : 1480 कोटी डॉलर

शिव नाडर : 1440 कोटी डॉलर

राधाकृष्णन दमानी: 1430 कोटी डॉलर

गोदरेज फॅमिली : 1200 कोटी डॉलर

लक्ष्मी मित्तल: 1050 कोटी डॉलर

कुमार बिरला: 960 कोटी डॉलर

 

Leave a Comment