आयकर विभागाचा वंचित आघाडीच्या कार्यालयावर छापा


मुंबई : अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अबुल हसन खान यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

यासंदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आयकर विभागाने वंचितचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या साकीनाका कार्यालयावर छापा टाकला. आयकर विभागाला या छाप्यात 1 हजार 100 रुपये आढळून आल्यानंतर आयकर विभागाने दिवसभर आमच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली, असा आरोप वंचित आघाडीकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेना सूडबुद्धीतून अशी कारवाई करत आहे, असेही वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वंचित बहुजन आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीआधी जागावाटपावरून वाद झाल्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडी या निवडणुकीत स्वबळावर लढत आहे.

Leave a Comment