आयएएस अधिकाऱ्याने स्वतःलाच ठोठावला 5 हजारांचा दंड.. पण का?

सोशल मीडियावर सध्या एका आयएएस अधिकाऱ्याची जोरदार कौतूक केले जात आहे. आयएएस अधिकारी आणि बीड जिल्ह्याचे कलेक्टर आस्तिक पांडे यांनी आपल्या ऑफिसमध्ये प्लास्टिकचा वापर केला म्हणून स्वतःलाच 5 हजारांचा दंड केला आहे.

सोमवारी सांयकाळी जिल्हा प्रशासनात एका प्रेस कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना प्लास्टिकच्या कपामध्ये चहा देण्यात आला. यावेळी एका पत्रकाराने आस्तिक पांडे यांना सांगितले की, हे प्लास्टिक बॅनचे उल्लंघन आहे. त्यानंतर पांडे यांनी आपली चूक मान्य करत स्वतःलाच 5 हजारांचा दंड ठोठावला आहे.

प्रेंस कॉन्फ्रेंस संपल्यानंतर पांडे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. प्लास्टिक दंडाचे 8 दिवसातील हे दुसरे प्रकरण असून, काही दिवसांपुर्वीच एक उमेदवार नामांकन दाखल करण्यासाटी डिपॉजिट रक्कम (नाणी) प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन आला होता. त्यानंतर त्या उमेदवाराला देखील 5 हजारांचा दंड करण्यात आला.

देशभरात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, सरकारी कार्यालयांमध्ये देखील सिंगल युज प्लास्टिक वापरावर बंदी आहे.

Leave a Comment