या क्रुरकर्म्याने हस्तमैथुन करत आतापर्यंत केली 93 महिलांची निघृण हत्या


एखाद्या दिव्यांग किंवा शारिरीक दुर्बलाला त्यातच जर वयोवृद्ध असेल तर त्याला पाहून आपल्यातील माणुसकी काही वेळासाठी का होईन पण जागी होते. पण काहीवेळा आपल्याला असे देखील वाटेल की हे चुकीचे आहे. असेच काहीसे चित्र अमेरिकेत पहायला मिळाले आहे. अमेरिकेच्या इतिहासातील 78 वर्षीय सॅम्युअल लिटल सर्वात धोकादायक सिरियल किलर असून, तो सध्या अमेरिकन पोलिसांच्या ताब्यात आहे. याबाबत पोलिसांना स्वत: दिलेल्या निवेदनात सॅम्युएलने कबूल केले आहे की, आतापर्यंत 93 महिलांची त्याने हत्या केली आहे. त्याने या अहवालात एकूण 14 राज्यातील महिलांची हत्या केली असल्याचे म्हटले आहे.

सॅम्युएलने आपल्या गुन्ह्यांची कबुली देत सांगितले की, रात्री उशिरा क्लबमधून परतणाऱ्या महिलांना तो आपल्या बोलण्यात फसवत असे. त्यानंतर त्यांना आपल्या सोबत घेऊन जाऊन त्यांना ठार मारत असे. तो आपल्या कारच्या मागील सीटवर सापळा रचून महिलांची गळा आवळून हत्या करीत असे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॅम्युअल केवळ सेक्सुअली मोटिव्हेट होऊनच महिलांची हत्या करीत असे, परंतु तो स्वत:ला बलात्कारी समजत नाही. जर कोणी त्याला बलात्कारी म्हणून संबोधले तर त्याला प्रचंड राग येत असे.
https://www.thesun.co.uk/wp-content/uploads/2019/10/NINTCHDBPICT000469003342.jpg
सॅम्युएल मधुमेहाचा रुग्ण असून त्याचे शरीर खूप कमकुवत झाले आहे, परंतु त्याला आपल्या दुष्कर्मांबद्दल अजिबात खंत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, इरेक्टाइल आजाराने तो ग्रस्त असल्यामुळे तो कोणावरही बलात्कार करू शकत नाही. त्यामुळे तो हस्तमैथुन करत महिलांचा खून करत असे. एका तपासणी दरम्यान, डिटेक्टिव्ह मार्सिया आणि त्याचा सहकारी डिटेक्टिव्ह मिट्झी रॉबर्ट्सने 2 महिलांच्या हत्येचा उलगडा केला, या दरम्यान त्यांनी काही डीएनए गोळा केले. नंतर दोघांनी या डीएनएची सॅम्युएलच्या डीएनएशी पडताळणी केली. त्यानंतर सॅम्युएलचा संबंध या खुनांशी जोडला गेला.

सॅम्युएलने सांगितले की, 1970 ते 2005 पर्यंत त्याने बहुतेक खून केले आहेत. एक वेबसाइट अमेरिकेची तपास एजन्सी एफबीआयने तयार केली आहे, ज्यामध्ये हत्येच्या व्हिडिओंचे रेखाटनही दाखवले गेले आहे. तीन खुनांमध्ये सॅम्युअल दोषी आढळल्यानंतर त्याला 2014 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आतापर्यंत पोलिसांनी 30 खुनांचे पुरावे गोळा केले आहेत.

Leave a Comment