ट्रांजेक्शन शुल्क न देता अशाप्रकारे काढा एटीएममधून दररोज 20 हजार रूपये

जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल तर तुम्ही दररोज 20 हजार रूपये एटीएममधून मोफत काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ट्रांजेक्शन शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र ही सुविधा देशातील काही निवडक एटीएमवरच मिळते. एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी दररोज एटीएममधून 10 हजार रूपये काढण्याचे लिमिट ठेवले आहे.

(Source)

खातेदारांकडे त्यांच्या फोनमध्ये योनो अ‍ॅप असणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे योनो अ‍ॅप आहे ते खातेदार दररोज 20 हजार रूपये खात्यातून काढू शकतात. योनो अ‍ॅपच्या मदतीने खातेधारक महिन्यातून कितीही वेळा एटीएममधून पैसे काढू शकतो. यासाठी डेबिट कार्डची देखील आवश्यकता नाही.

(Source)

तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून योनो अ‍ॅप डाउनलोड करू शकता. त्यानंतर इंटरनेट बँकिगचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून अकाउंट उघडू शकता. अकाउंट उघडल्यावर तुम्हा 6 आकडी एम-पिन येईल. पुढील वेळी लॉगिन करताना हा पिन उपयोगी येईल.

(Source)

एसबीआयच्या या सेवेचे नाव योनो कॅश असे आहे. जर तुम्हाला एटीएम कार्डचा वापर करून कॅश काढायची असेल तर यासाठी अ‍ॅपवर रिक्वेस्ट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला 6 आकडी पिन मिळेल.

(Source)

सध्या देशभरात स्टेट बँकेचे 60 हजार एटीएम आहेत. यातील 28 हजार एटीएमवर योनो अपचा वापर करू शकता. लवकरच इतर एटीएमवर देखील ही सुविधा सुरू होईल.

Leave a Comment