अवघ्या ५ दिवसात टायगर – हृतिकच्या ‘वॉर’ने रचले ‘हे’ विक्रम


गांधी जयंतीच्या दिवशीच म्हणजेच 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ चित्रपट आला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडत अवघ्या चारच दिवसात शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाच्या कमाईत आठवडाभरात वाढच होत गेली आहे. या चित्रपटाने पाचव्या दिवशी १५० कोटीच्या घरात एन्ट्री केली आहे.

चित्रपटाच्या कमाईची भर पाहता हा चित्रपट २०० कोटी क्लबमध्येही लवकरच एन्ट्री करेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. टायगर आणि हृतिक दोघांच्याही करिअरमधला हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. २०१९ चा हा कमी दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला विकेंडशिवाय सणांचाही फायदा झाला आहे. या चित्रपटाला सुट्ट्यांमुळे प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात थरारक अ‌ॅक्शन्ससोबतच टायगर – हृतिकची जोडी असल्यामुळे हा चित्रपट चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाला चित्रपट समीक्षकांनीही चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेलुगू आणि तमिळ भाषेतही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटासोबतच ‘सैरा नरसिंह रेड्डी’ या चित्रपटाची शर्यत होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. आत्तापर्यंत ‘वॉर’ चित्रपटाने १७ विक्रम रचले आहेत.

वॉर हा हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ, तसेच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट बनला आहे. हा चित्रपट सुट्ट्यांच्या दिवशी धमाकेदार ओपनिंग करणारा चित्रपट ठरला. तसेच यशराज बॅनरचा देखील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर कोणत्याही सिक्वेल शिवाय बनलेला सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट असून गांधी जयंतीच्या दिवशी प्रदर्शित झालेला सर्वाधिक ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला आहे. २०१९ चा तिसऱ्या दिवशीही डबल डिजीट आकड्यांचा व्यवसाय करणारा चित्रपट बनला आहे. यांसारखे बरेच विक्रम या चित्रपटाने रचले आहेत.

Leave a Comment