अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


एक हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असलेला अभिनेता अंकुश चौधरी येत आहे. त्याचा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. अंकुशसोबत या चित्रपटात २ अभिनेत्री झळकणार आहेत. अलिकडेच या चित्रपटातील अंकुश आणि पल्लवी पाटील यांची भावनिक केमेस्ट्री असलेले गाणे रिलीज करण्यात आले होते.

या गाण्याचे बोल ‘रोज वाटे’ असे असून हे गाणे बेला शेंडेने गायले आहे. अविनाश विश्वजित यांचे संगीत आणि पार्श्वसंगीत या चित्रपटाला लाभले आहे. तर गुरु ठाकूर, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, विश्वजित जोशी यांची गीते आहेत.

अंकुश चौधरी, शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील यांच्यासह प्रविण विठ्ठल तरडे, राकेश बेदी यांच्या ‘ट्रिपल सीट’ चित्रपटात भूमिका आहेत. नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया यांची निर्मिती असलेल्या ‘ट्रिपल सीट’ची कथा, पटकथा, संवाद आणि क्रिएटीव्ह दिग्दर्शन अॅड. अभिजित अरविंद दळवी याचे आहे. तर, सहनिर्माता स्वप्नील संजय मुनोत आणि सहाय्यक निर्माता अॅड. पुष्कर श्रीपाद तांबोळी आहेत. अनुष्का मोशन पिक्चर्स आणि एंटरटेनमेंट, अहमदनगर फिल्म कंपनी निर्मित ‘ट्रिपल सीट’ यंदाच्या दिवाळीत २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment