जवानांच्या या व्हिडीओवर आनंद महिंद्रा म्हणतात, ‘हाऊज द जोश’

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे आपल्या ट्विटमुळे  नेहमी चर्चेत असतात. नुकताच त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये सैन्याचे जवान गरबा खेळताना दिसत आहे. नवरात्रीच्या निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत असून, युजर्सकडून कौतूक केले जात आहे.

याआधी महिंद्रा यांनी बेस्ट दांडिया डॅड कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते. त्यानंतर अनेक युजर्सनी महिंद्रा यांना टॅग करत दांडियाचे व्हिडीओ शेअर केले.

जवानांचा हा गरबा खेळतानाचा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, आपल्या दांडिया डेड कॉम्पिटिशनसाठी आतापर्यंत आउटस्टँडिंग एंट्रीज आलेली नाही. मात्र यासारख्या व्हिडीओची त्सुनामी आली आहे. यामधील एक आहे, ज्याला मी सॅल्यूट करतो. हे म्हणण्याची गरज नाहीच हाऊ द जोश इज !

आनंद महिंद्रा या रिट्विट केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज आले आहेत. तर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment