आता एसएमएस पाठवून करा आधारकार्ड लॉक-अनलॉक

आज आधार कार्डचा वापर हा सिम कार्ड खरेदी करण्यापासून ते  बँक अकाउंट खोलण्यापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. याचबरोबर लोकांची खाजगी माहिती देखील या कार्डशी जोडण्यात आलेली आहे. मात्र एखाद्या कारणामुळे डाटा लीक झाला तर, मोठे नुकसान होऊ शकते. या समस्येवर उपाय म्हणून यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) ने एक नवीन फिचर आणले आहे. कार्डधारक या फिचरचा वापर करून आधार नंबर लॉक अथवा अनलॉक करू शकतात.

(Source)

आधार कार्डच्या या फिचरचा वापर करून डाटा सुरक्षित ठेऊ शकणार आहेत. याचबरोबर आधार कार्डद्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार देखील थांबतील. हे फिचर एखाद्या लॉकप्रमाणे काम करेल, इतर बाहेरील व्यक्ती ते अनलॉक करू शकणार नाहीत.

याचबरोबर हॅकर्स लोकांच्या परवानगीशिवाय आधार व्हेरिफिकेशन करू शकणार नाहीत. या फिचरचा वापर करण्यासाठी कार्डधारकांना आपल्या रजिस्टर नंबरवरून आधार नंबर लॉक करण्यासाठी एसएमएस पाठवावा लागेल.

(Source)

असे करा लॉक –

आधार नंबर लॉक करण्यासाठी कार्ड धारकांना 1947 या नंबरवर GETOTP लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. त्यानंतर कार्ड धारकाला LOCKUID आणि आधार नंबर लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार लॉक होईल.

(Source)

असे करा अनलॉक –

आधार नंबर अनलॉक करण्यासाठी कार्डधारकाला 1947 या नंबरवर GETOTP आधार नंबर असे लिहून पाठवावे लागेल.

6 आकडी ओटीपी मिळाल्यानंतर UNLOCKUID आधार नंबर आणि ओटीपी लिहून 1947 वर पाठवावा लागेल. त्यानंतर आधार कार्ड अनलॉक होईल.

Leave a Comment