व्हायरल : या कुत्र्याचा चेहरा आहे मनुष्यासारखा

नोरी नावाचे एक कुत्रे सध्या आपल्या चेहऱ्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  नोरीचे बदामासारखे डोळे आणि हास्य देखील मनुष्याप्रमाणे आहे. या कुत्र्याचे मालकाने सांगितले की, ही एक खास ऑस्ट्रिलयन प्रजाती ऑसीपूडल आहे. अनेकांना वाटत आहे की, नोरीचा जो फोटो आहे, तो एडिट केलेला आहे.

View this post on Instagram

I’m just a shy little guy!

A post shared by NORI (@norichiban) on

कुत्र्याचे मालक केविन हर्लेस आणि टिफनी एनगोने सोशल मीडियावर नोरीचे फोटो शेअर केल्यानंतर हे फोटो व्हायरल झाले. या दांपत्याचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर नोरीबद्दल जे बोलले जात आहे, त्यात काही नवीन नाही. त्याला कधी बाहेर घेऊन गेल्यावर लोकांच्या अशाच प्रतिक्रिया येत असतात.

View this post on Instagram

Mondaze.

A post shared by NORI (@norichiban) on

केविनने याबद्दल सांगितले की, जेव्हा नोरी लहान बाळ होते, तेव्हा त्याला बघणारे आम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय राहू शकत नव्हते. लोक आम्हाला नेहमी म्हणतात की, नोरीचे डोळे आणि चेहरा मनुष्याप्रमाणे आहे.

View this post on Instagram

Muffy is near.

A post shared by NORI (@norichiban) on

त्यांनी सांगितले की, नोरी जेव्हा छोटा होता तेव्हा त्याच्या केसांचा रंग एकदम गडद होता. त्याची तुलना स्टारवॉर्समधील पात्र चेवाबेकाशी केली जाते. सोशल मीडियावर नोरीचे फोटो व्हायरल होत असून, नेटकऱ्यांना त्याचे डोळे आणि हास्य भलतेच आवडले आहे.

 

Loading RSS Feed

Leave a Comment