आता सुरक्षा रक्षकांशिवाय परदेश दौऱ्यावर जाऊ शकणार नाहीत वीवीआयपी

स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षेत केंद्र सरकारने बदल केले आहेत. ही विशेष सुरक्षा प्राप्त व्यक्तीला आता परदेश दौऱ्यावर जाताना देखील आपल्याबरोबर जवानांना घेऊन जावे लागणार आहे. केवळ पंतप्रधान मोदीच नाही तर ही सुरक्षा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत एसपीजीचे जवान परदेश दौरे करतील.

याआधी असा नियम नव्हता, मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने हे नियम बदलले आहे. सरकारचा हा निर्णय काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि गांधी परिवारातील अन्य सदस्यांशी जोडला जात आहे.

देशाचे पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा देण्यात येत असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देखील एसपीजी सुरक्षा देण्यात येत होती, मात्र काही दिवसांपुर्वीच त्यांची सुरक्षा कमी करून, त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात येत आहे.

सध्या एसपीजी सुरक्षा ही पंतप्रधान मोदी आणि गांधी परिवाराला मिळते.  एसपीजी सुरक्षेंतर्गत गांधी परिवार आतापर्यंत देशात जवानांना सोबत ठेवत असे, मात्र परदेशात सोबत घेऊन जात नसे. याबाबत गांधी परिवार प्रायव्हेसीसाठी असे करत असे सांगितले जाते.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयानंतर आता एसपीजीचे जवान नेहमी वीवीआयपींबरोबर असतील.  आता गांधी परिवाराला देखील परदेश दौऱ्यात एसपीजी जवानांना सोबत घेऊन जावे लागणार आहे.

Leave a Comment