एचएसबीसी १० हजार कर्मचाऱ्यांना देणार नारळ


नवी दिल्ली: लवकरच मोठ्याप्रमाणावर ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येणार असल्यामुळे १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय बँकेचा खर्च कमी करण्यासाठी घेण्यात आल्याचे एचएसबीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी नोएल क्विन यांनी सांगितले.

यासंदर्भातील वृत्त ‘फायनान्शियल टाईम्स’ने दिले आहे. चालू तिमाहीचे निकाल महिनाखेरीसी समोर आल्यानंतर या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल. ४७०० कर्मचाऱ्यांची कपात पहिल्या टप्प्यात केली जाईल. अधिक वेतन असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम कामावरून कमी केले जाईल.

ऑगस्ट महिन्यात एचएसबीसीच्या सीईओपदाची सूत्रे नोएल क्विन यांनी हाती घेतली होती. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता हा निर्णय घेणे गरजेचे होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलांची आवश्यकता आहे. चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्ध वाढल्यामुळे उद्योग क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे ही कपात होत असल्याचा अंदाज जाणकारांकडून वर्तविण्यात आला.

यापूर्वी भारतातील कार्यालयांमधून १५० कर्मचाऱ्यांना एचएसबीसीकडून हटवण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने पुणे आणि हैदराबादमधील कार्यालयांचा समावेश होता. जागतिक स्तरावर एचएसबीसी बँकेकडून व्यवस्थेची पुर्नबांधाणी करण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Leave a Comment