जमिनीपासून 160 फूटावर असलेल्या या रेस्टोरेंटमध्ये ग्राहक करतात गर्दी

नोएडाच्या सेक्टर 38 येथे जमीनीपासून 160 फूट उंचीवर बनवण्यात आलेले रेस्टोरेंट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या रेस्टोरेंटचे नाव फ्लाय डायनिंग आहे. लोकांना फ्लाय डायनिंगमध्ये टेबलावर बसून जेवणाचा आनंद घेणे आवडत आहे. हे रेस्टोरेंट सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. एका ग्राहकासाठी येथे डिनरसाठी 40 मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आलेला आहे. क्रेनच्या मदतीने हवेत लटकलेल्या डायनिंग टेबलवर 24 सीट आहेत.

हवेत जेवण देण्याची कल्पना रेस्टोरेंटचे मालक निखिल कुमार यांना 2 वर्षांपुर्वी दुबईचा प्रवास करताना आली होती. ते सांगतात की, हे खूप अवघड काम होते, कारण खूप अडचणी आल्या. सर्वात प्रथम यासाठी ग्राहकांना तयार करावे लागले. त्यानंतर सुरक्षेचे सर्व उपाय तपासण्यात आले. ज्यामुळे ग्राहकांना उचांवर जेवण घेताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

निखिल सांगतात की, दोन वर्ष फ्लाय डायनिंगच्या स्टाफला जर्मनीच्या विशेषज्ञांनी ट्रेन केले. डायनिंगच्या प्रत्येक सीटला बकलिंग लॉक फिचर आहे. क्रेनसोबतच इतर सर्व उपकरणांची दररोज तपासणी केली जाते. फ्लाय डायनिंगवर गर्भवती महिला आणि लहान मुलांना चार फुटांपेक्षा अधिक उंचीवर जेवणाची परवानगी देण्यात येत नाही.

फ्लाय डायनिंगवर आपला वाढदिवस साजरा केलेल्या पारूल गुप्ता सांगतात की, हा खरचं एक रोमांचकारी अनुभव होता. इतर ग्राहकांनी देखील हा अनुभव एकदम वेगळा असल्याचे सांगितले.

 

Leave a Comment