या कंपनीचा अवघ्या 6999 रुपयांचा 32-इंची LED टीव्ही लाँच


भारतीय बाजार पेठेत भारतीय इलेट्रॉनिक्स कंपनी डिटलने (Detel) 32 इंची नवीन LED TV सादर केला आहे. 6,999 रुपये एवढी या TV ची किंमत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, भारतीय बाजारात मिळणारा हा सर्वात स्वस्त 32 इंची टीव्ही आहे. कंपनी या मॉडलच्या माध्यमातून 32 इंची TV सेगमेंटमध्ये आपले स्थान बनवत आहे. कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटसोबतच फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवरुन या टीव्हीला खरेदी केले जाऊ शकते.

32 इंच A+ ग्रेड पॅनल TV मध्ये दिला आहे. 1280X720 पिक्सल याचे डिस्प्ले रेजोल्यूशन आहे. TV मध्ये 10W स्पीकर दिला आहे जो, 20W चा साउंड आउटपुट देतो. हा डॉल्बी डिजिटल साउंड टेक्नॉलजीला सपॉर्ट करतो. HDMI आणि USB पोर्टच्या मदतीने यात पीसी, लॅपटॉप किंवा पेन ड्राइव कनेक्‍ट करता येते. यात प्रीलोडेड गेम्‍स आणि ऑडियो, व्हिडिओ प्रीसेट मिळतो. डिटलचे CEO योगेश भाटियाने सांगितले की, कंपनीच्या 17 इंची टीव्हीला चांगला रिस्पॉन्स मिळाला. आता कंपनी कमी किमतीत 32 इंची टीव्ही आणत आहे. प्रत्येकाला टीव्ही घेता आला पाहीजे, म्हणून हा टीव्ही आणला आहे.

Leave a Comment