पुढच्या वर्षी नोकरदारांच्या हक्काच्या अनेक सुट्या येणार गदा


मुंबई – गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअप ग्रुपवर पुढील वर्षी किती सुट्ट्या असतील, कोणत्या सुट्ट्या विकेंडला जोडून येणार आहेत त्यानुसार होणाऱ्या प्लॅनच्या चर्चा सुरु आहेत. पण पुढील नोकरदारांच्या सुट्ट्यांवर गदा येणार आहे. कारण पुढील वर्षातील अनेक हक्काच्या सुट्ट्या या शनिवारी किंवा रविवारी आल्या आहेत. जानेवारी, जून, जुलै, सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये तर एकही अतिरिक्त सुट्टी नाही. एकंदरितच २०२० हे वर्ष नोकरदारांना अनेक सुट्ट्यांना मुकावे लागणारे वर्ष ठरणार आहे. तर आम्ही आज तुम्हाल पुढील वर्षाच्या कोणकोणत्या माहिन्यात किती सुट्ट्या आहेत आणि कोणत्या सुट्यांना नोकरदारांना मुकावे लागणार आहे ते सांगणार आहोत.

सर्वाधिक म्हणजेच चार अतिरिक्त सुट्ट्या एप्रिल महिन्यामध्ये असणार आहेत. त्या खालोखाल मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी तीन सुट्ट्या असणार आहेत. तीन अतिरिक्त सुट्ट्या ऑगस्टमध्येही आहेत पण या सर्व सुट्ट्या शनिवारी आहेत. म्हणजेच पाच दिवस काम करणाऱ्यांसाठी हा फटका आहे. तीन सुट्ट्या नोव्हेंबरमध्येही आहेत पण ऑगस्टप्रमाणे यातील एक सुट्टी (लक्ष्मीपूजन) ही शनिवारी आहे. फेब्रुवारी, मार्च, ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी दोन अतिरिक्त सुट्ट्या असणार आहेत. तर डिसेंबरमध्ये केवळ एक अतिरिक्त सुट्टी (नाताळ) असणार आहे. एकही अतिरिक्त सुट्टी जानेवारी, जून, जुलै, सप्टेंबर महिन्यांमध्ये नसणार आहे.

२०२०मध्ये दरवर्षी आवर्जून मिळणाऱ्या अनेक सुट्ट्या या शनिवारी आणि रविवारी आहेत. अशा सुट्ट्यांची यादी माझा पेपरच्या वाचकांसाठी …
रविवार २६ जानेवारी, गणराज्य दिन, शनिवार १ ऑगस्ट बकरी ईद, शनिवार १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, शनिवार २२ ऑगस्ट गणेश चतुर्थी, रविवार २५ ऑक्टोबर दसरा, शनिवार १४ नोव्हेंबर लक्ष्मीपूजन अशा सुट्ट्यांना नोकरदारांना मुकावे लागणार आहे. तर आठवड्याच्या मध्येच असणाऱ्या सुट्ट्या २०२० मध्ये केवळ तीन महिन्यांमध्ये आहेत. यामध्ये १९ फेब्रुवारी (बुधवार) म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे), २५ मार्च (बुधवार) गुढीपाडवा आणि ७ मे (गुरुवार) बुद्ध पोर्णिमा या सुट्ट्यांचा समावेश आहे.

पुढील वर्षी विकेण्डला जोडून आलेल्या शुक्रवार २१ फेब्रुवारी महाशिवरात्री, शुक्रवार १ मे महाराष्ट्र दिन, सोमवार २४ मे रमजान ईद, शुक्रवार २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती, शुक्रवार ३० ऑक्टोबर, कोजागिरी पोर्णिमा आणि ईद-ए-मिलाद, सोमवार १६ नोव्हेंबर भाऊबीज, सोमवार ३० नोव्हेंबर, गुरु नानक जयंती, शुक्रवार २५ डिसेंबर, नाताळ या आठ सुट्ट्या आहेत.

नोकरदारांना अनेक हक्काच्या सुट्ट्या शनिवार, रविवारी आल्याने फटका बसणार असला तरी वर्षामध्ये अशा काही संधी आहेत जेव्हा विकेण्डला जोडून एक सुट्टी घेतली तर पाच दिवसांची सुट्टी मिळू शकते.

होळी ९ मार्चला आहे. सार्वजनिक सुट्टी या दिवशी नसली तरी धूलिवंदनाची सुट्टी मंगळवारी म्हणजेच १० मार्चला आहे. त्यामुळे सोमवारी सुट्टी घेतल्यास ७ ते १० असा चार दिवसांचा लाँग विकेण्ड मिळू शकतो. त्याचबरोबर गुड फ्रायडेची सुट्टी १० एप्रिलला आहे तर डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या जंयतीनिमित्त मंगळवारी १४ एप्रिलला सुट्टी असल्यामुळे सोमवारी १३ एप्रिलला सुट्टी घेतल्यास १० ते १४ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते. रामनवमीची २ एप्रिलला सुट्टी आहे तर महावीर जयंतीची सुट्टी ६ तारखेला असल्यामुळे ३ तारखेला शुक्रवारी सुट्टी घेतल्यास २ ते ६ अशी पाच दिवस सुट्टी मिळू शकते.

Leave a Comment