गुगल ट्रांसलेटमध्ये अंबानी टाकले की बघा काय होते

अंबानी नावाचा अर्थ विचारला तर कोणतीही भारतीय व्यक्ती याचे उत्तर ‘पैसा’ असे देईल. कारण भारतात अंबानी म्हणजेच ‘पैसे’ असे एक समीकरण तयार झालेले आहे. मागील 8 वर्षांपासून मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत. अर्थात ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, यात काही आश्चर्य नाहीच, हे तर सर्वांनाच माहिती आहे. मात्र अंबानी या नावाचा अर्थच पैसा होतो. हो हे खरे आहे. हे आम्ही नाही तर स्वतः गुगल ट्रांसलेटर सांगत आहे.

अंबानी हे आडनाव गुगल ट्रांसलेटरवर रोमानियन भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर केले तर अंबानी अडनावाचे भाषांतर हे ‘माझ्याजवळ पैसे आहेत’ असे येते. रेडिटवर या भाषांतरचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.

मुकेश अंबानी हे भारतील सर्वात श्रींमत तर जगातील श्रींमतांच्या यादीत 13 व्या स्थानवर आहेत. फॉर्ब्स मॅग्झिननुसार 2019 मध्ये मुकेश अंबानी यांची संपती 51.1 बिलियन डॉलर म्हणजेच 36,12,10,05,00,000 रुपये एवढी आहे. आता एवढी संपत्ती असताना अंबानी नावाचे असे भाषांतर गुगलने दाखवले नसते तर नवलचं.

Leave a Comment