सौदीने नियम बदलले, आता अविवाहित जोडपे राहू शकणार हॉटेलमध्ये एकत्र

अनेक गोष्टी करण्यास बंदी असलेल्या सौदी अरेबियात हळू-हळू नियम शिथिल करण्यात येत आहे. एका निर्णयामध्ये आता सौदी सरकारने महिला आणि पुरूषला हॉटेलच्या एकाच रूममध्ये राहण्याची परवानगी दिली आहे. हा नियम परदेशी कपलला लागू होईल. सौदीच्या नागरिकांना यासाठी ओळखपत्र दाखवावे लागेल.

सौदी सरकारच्या पर्यटन आणि नॅशनल हेरिटाज मंत्रालयाने म्हटले आहे की, सौदी अरबच्या नागरिकांना ओळखपत्र अथवा नात्याचे प्रमाण दाखवावे लागेल. मात्र परदेशी कपल्सला कोणतीही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही. याचबरोबर एकटी महिला देखील हॉटेलच्या रूममध्ये राहू शकते.

याआधी सौदी अरेबियात असे करण्यास बंदी होती. याआधी सौदीत परदेशी कपल्सला एकत्र रूम घेण्यासाठी आपले नाते सिध्द करावे लागत असे. सौदीमध्ये लग्नाशिवाय महिला आणि पुरूषाला एकत्र राहण्यावर प्रतिबंध होते.

सौदी सरकारने नवीन पर्यटन व्हिसा नीति अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. परदेश पर्यटक अधिकाधिक यावेत व गुंतवणुकीत वाढ व्हावी यासाठी सौदीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सौदीमधील महिलांना एकटे प्रवास करण्याची संधी मिळेल. तसेच अविवाहित परदेशी प्रवासी सौदी सारख्या देशात एकत्र राहू शकतील.

याशिवाय सौदी अरेबियाने काही दिवसांपुर्वीच 49 देशांच्या परदेशी पर्यटकांना व्हिसा देण्याची घोषणा केली आहे. तसेच परदेशी महिलांना बुर्का घालण्याचे प्रतिबंध देखील हटवण्यात आले आहेत.

याआधी सरकारने महिलांना ड्रायव्हिंग लायसेंसची देखील परवानगी दिली होती. तसेच सौदीच्या महिला एकट्या परदेशात देखील जाऊ शकतात.

Leave a Comment