तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही सांगणार गुगल


एखाद्या हॅकर्सकडून जर तुमचा पासवर्ड चोरी करण्यात आला असल्यास आता तुमची या संबंधी मदत गुगल करणार आहे. यापूर्वी पासवर्ड बदलण्यासाठी कंपनीने काही कालावधी युजर्सला दिला होता. पण कंपनीने आता याच्या इनबिल्ट फिचरमध्येच बदल करण्याचा विचार केला असल्यामुळे रियल टाइम पासवर्ड प्रोटेक्शन युजर्सला मिळणार असून कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

मॅनेजर अॅन्ड्रॉइड आणि क्रोम सोबत गुगल पासवर्ड सिंक केलेला असतो. कंपनीकडून आता एक नवे फिचर आणले असून त्याचे Password Checkup असे नाव असल्यामुळे कोणत्या बड्या सिक्युरिटी ब्रीचचा तुमचे लॉग इन हिस्सा आहे की नाही हे कळू शकणार आहे. हे फिचर इनबिल्ट असणार आहे.

तुमचा जर अकाउंट पासवर्ड हॅक करण्यात आला आहे की नाही ते गुगलकडून पासवर्ड चेकअप या फिचरमुळे सांगण्यात येणार आहे. तसेच तुम्ही Low पद्धतीचा पासवर्ड ठेवत असाल त्या संदर्भात ही तुम्हाला कळवली जाणार आहे. सध्या गुगल क्रोममध्ये बिल्ट इन पासवर्ड चेक अप दिल्याने पासवर्ड हॅक होण्यासंबंधित तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही. कंपनीने हे फिचर टूल सिक्युरिटी इश्यू संबंधित लॉन्च करण्यात आले आहे.

चेकअप ऑप्शन गुगलने अकाउंटमध्येच दिले आहे. तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे की नाही हे यावरुन कळणार आहे. जर तुम्ही शेवटी वापरलेला पासवर्ड यूज करत असल्यास या फिचर टूलमधून सुद्धा तुम्हाला तो वापरता येणार आहे. Password.google.com येथून तुम्हाला अॅक्सेस करता येणार आहे.

Leave a Comment