हा आहे यंदाच्या निवडणुकीतील भाजपचा सर्वात श्रीमंत उमेदवार


मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक ठरले आहेत. भाजपने विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांना डावलून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली. शेवटच्या दिवशी पराग शहा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. शहा यांनी उमेदवारी अर्जात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती ५००.६२ कोटी असल्याचे नमूद केले आहे.

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार ४४२ कोटींची शहा यांच्याकडे जंगम मालमत्ता आहे तर ७८ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. ठाण्यात शहा यांच्या मालकीचा ५ हजार ७१० चौरस फुटांचा आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत १५ कोटी रुपये आहे. शहा यांच्या चेंबूरमध्ये तीन सदनिका असून त्यांचे बाजारमूल्य २५ कोटींच्या घरात आहे. पराग शहा आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये जमिनी आहेत. शहा यांच्या पत्नीकडे आलिशान कार असून या कारची किंमत २.४७ कोटी आहे. दोघांची मालकी हक्क असलेल्या दागिन्यांचे बाजार मूल्य हे ३.४५ कोटी असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment