विदुषक म्हणत रणवीर सिंहला नेटकऱ्यांनी हिणवले


आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये अभिनेता रणवीर सिंहने आपली स्वत:ची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक भूमिकेला रणवीर योग्य न्याय मिळवूनच देतो. या व्यतिरिक्त आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळेदेखील रणवीर नेहमी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील इतर कलाकारांपेक्षा अतिशय हटके अशी त्याची ड्रेसिंग स्टाईल असते. तो त्याच्या या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोलही झाला आहे. आतादेखील असेच काहीसे घडले आहे.

सोशल मीडियावर नुकताच रणवीर सिंहचा एक फोटो व्हायरल झाला आहे. डबिंग स्टूडियोमधून बाहेर पडतानाचा रणवीरचा हा फोटो आहे. रणवीरने या फोटोमध्ये लाल रंगाचा हुडी परिधान केला आहे. अनेकांना असे वाटेल की रणवीर तर नेहमीच हूडी परिधान करतो. पण हा हूडी थोडा हटके आहे. हा हूडी रणवीरच्या पायापर्यंत आला आहे. त्याने या हूडीवर हिरव्या रंगाचे शूज आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. चाहत्यांच्या पसंतीला त्याचा हा हटके लूक फारसा उतरला नसल्याचे दिसत आहे.


तू कार्टून दिसत आहेस, सर्वांत मोठा विदुषक आला पाहा अशा कमेंट देत नेटकऱ्यांनी रणवीरची खिल्ली उडवली आहे. रणवीर सध्या त्याचा आगामी ’83’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. 25 जून 1983 रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. ’83’ हा चित्रपट याच विजयगाथेवर आधारित आहे. दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंह, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment